चोपडा येथे गुर्जर भवन पूर्णत्वाकडे

कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतून समाजाला मिळणार नवे व्यासपीठ

बातमी शेअर करा...

चोपडा येथे गुर्जर भवन पूर्णत्वाकडे; लवकरच लोकार्पण 

जळगाव जिल्ह्यातील पहिलेच भव्य दिव्य गुर्जर भवन चोपड्यात

कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नांतून समाजाला मिळणार नवे व्यासपीठ

चोपडा l प्रतिनिधी

चोपडा शहर आणि तालुक्यातील गुर्जर समाज बांधवांसाठी एक ऐतिहासिक सोयीचे ठिकाण शहरातील नारायण वाडी येथे उभारले जात असून, कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या विशेष पुढाकारातून “गुर्जर भवन” ही भव्य इमारत आता पूर्णत्वाकडे येत आहे. तब्बल ७० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे भवन लवकरच समाजाला समर्पित होणार असून, त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात होणार आहे.

चोपडा शहर आणि तालुका ही गुजर समाज बांधवांची राजधानी मानली जाते. चोपडा तालुका म्हणजेच गुर्जर समाजाचे प्रमुख केंद्र मानले जाते. या समाजाची संख्या लक्षणीय असल्यामुळे, समाज बांधवांसाठी एक प्रशस्त, सुसज्ज आणि सर्व सुविधा असलेले भवन असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती.

विवाह सोहळे, मंगलकार्य, शोकसभा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम तसेच विविध कार्यक्रम एकाच छताखाली पार पडावेत या उद्देशाने शहरातील नारायण वाडी येथे गुर्जर भवन उभारणीचे स्वप्न आमदार सोनवणे यांनी साकारले.

या मागणीला तातडीने प्रतिसाद देत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी निधी उपलब्ध करून दिला. परिणामी ७० लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेली ही भव्य इमारत आता पूर्णत्वास येत असून, समाज बांधवांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

भवनात आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज प्रशस्त हॉल, आवश्यक सोयी सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात हे भवन केवळ गुर्जर समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आदर्श व्यासपीठ ठरणार आहे.

गुर्जर समाज बांधवांनी आपल्या मागणीला त्वरित प्रतिसाद देऊन ही भव्य इमारत उभारणीस मंजुरी देणाऱ्या आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजासाठी एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.

लवकरच गुर्जर भवनाचे लोकार्पण सोहळा पार पडणार असून, तो दिवस समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल यात शंका नाही. गेल्या ४० वर्षात विरोधकांनी गुर्जर समाजाच्या मतांवर कॅबिनेट मंत्री ते विधानसभेचे सभापती पद भूषवले आणि राजकारण केले त्यांनी गुर्जर समाजाला न्याय दिला नाही मात्र अवघ्या १० वर्षात कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आ. सौं लताताई सोनवणे यांनी करून दाखवले, अशा प्रतिक्रिया गुर्जर समाजातून व्यक्त होत आहेत.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात गुर्जर समाजाचे ३ मंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जळगाव शहरात देखील भव्य असे गुर्जर भवन व्हावे अशी अपेक्षा गुर्जर समाजाकडून व्यक्त होत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम