चोपडा येथे रविवारी अमृत बंग यांचे व्याख्यान

बातमी शेअर करा...

चोपडा येथे रविवारी अमृत बंग यांचे व्याख्यान

चोपडा प्रतिनिधी चोपडा शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी तथा माजी मुख्याध्यापक स्व. यशवंत गोविंद हरताळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ७ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता विवेकानंद विद्यालयात अमृत अभय बंग यांचे ‘युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

स्व. यशवंत हरताळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सन २०१५पासून दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्यात्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यात अविनाश धर्माधिकारी, डॉ. सुनीलकुमार लवटे, कांचन परुळेकर, अच्युत गोडबोले, दीपक करंजीकर, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. सागर देशपांडे या मान्यवरांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम