
चोपडा येथे स्वामी विवेकानंद पुतळ्याचे अनावरण
परिसरातील विकासकार्यांचेही उद्घाटन
चोपडा (प्रतिनिधी) – गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वामी विवेकानंद नगर क्र. २ येथे स्वामी विवेकानंद यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा दि. ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गालगत संपन्न झाला.
पुतळ्याचे अनावरण डॉ. विकास हरताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विजय पोतदार, ॲड. रवींद्र जैन आणि गोवर्धनदास पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे, सदर अर्धाकृती पुतळा व चबुतऱ्याचे बांधकाम के. ए. कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजिनिअर अनिस बोहरी साहेब यांनी स्वखर्चातून उभारले आहे.
स्वामी विवेकानंद नगर क्र. २ मधील खुल्या भूखंडावर आकर्षक बाग विकसित करण्यात आली असून, त्यामध्ये वॉकिंग ट्रॅक, आरामदायक बेंच, मऊ गवताचे लॉन, एलईडी लाइट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण लेआउटमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याचे नगरपालिका कनेक्शन, दोन कूपनलिका, पथदिवे, ट्रीमिक्स काँक्रीट रस्ते अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एस.के. महाजन सर, अश्विन भावसार, मोहसिन पठाण, शरीफ मिस्तरी, शब्बीर मिस्तरी, जीवन लोहार, सुधाकर चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम