
चोपडा विधानसभा क्षेत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबीर
चोपडा विधानसभा क्षेत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबीर
चोपडा : राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबीर ’ अभियानांतर्गत चोपडा विधानसभा क्षेत्रातील धानोरासह सर्व गावांसाठी संयुक्त महसूल व शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत विविध योजनांचे धनादेश व लाभ वाटप केले.
या शिबिरात सुमारे १२०० ते १३०० नागरिकांनी सहभाग घेतला. महसूल, आरोग्य, कृषी, महावितरण, ग्रामीण जलपुरवठा आदी अनेक शासकीय विभागांनी एकत्रितपणे सेवा पुरवल्यामुळे नागरिकांना आपल्या गावातच सर्व प्रशासकीय सुविधा मिळाल्या.
शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार अनिल विसवे, गटविकास अधिकारी दीपक साळुंखे, तालुका कृषी अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद वाघ, अडावद पोलीस स्टेशनचे निरीक्षक योगेश पाटील, मंडल अधिकारी अजय पावरा तसेच सर्व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला माणिकराव महाजन (माजी अध्यक्ष, पंचायत समिती चोपडा), गोकुळ कोळी, चंद्रशेखर साळुंखे , प्रवीण कोळी, मंगल इंगळे, भाऊसाहेब थोरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन भूषण पाटील व स्वप्निल कुलकर्णी यांनी केले. या संयुक्त समाधान शिविरामुळे नागरिक समाधान व्यक्त करताना शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम