
चोपडा शहरात दोन नवीन आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण
चोपडा शहरात दोन नवीन आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण
मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध
चोपडा (प्रतिनिधी) : 15 व्या वित्त आयोग अंतर्गत चोपडा शहरातील आशा टाकी परिसरातील पटवे गल्ली व के.जी.एन. कॉलनी येथे शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र तथा आयुष्मान आरोग्य मंदिर या दोन नवीन आरोग्य केंद्रांचे उद्घाटन आज चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, चाचण्या, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण तसेच ई-सेवा यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
या प्रसंगी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी नागरिकांना आवाहन केले की, या केंद्रांचा अधिकाधिक लाभ घेऊन आरोग्यदृष्ट्या सजग रहावे.
कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक शिवराज पाटील, विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, सागर ओतारी, कैलास बाविस्कर, महेमुद बागवान, महेंद्र धनगर, दीपक चौधरी, प्रदीप बारी, निजाम कुरेशी, मोईन कुरेशी, गणेश पाटील, बडगुजर, नंदकिशोर गवळी, हाजी शेख, देशमुख, देवेंद्र पाटील, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा बोरसे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विवेक जैस्वाल, आरोग्य सहाय्यक जगदीश बाविस्कर आणि इतर आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम