चोपडा तालुक्यात विकास कामाची गंगा
वर्डी येथील खडक्या नाल्यावरील 25 लाखांच्या बंधाऱ्यास विरोध; विरोधकांचा विकास कामास विरोध
चोपडा तालुक्यात विकास कामाची गंगा
वर्डी येथील खडक्या नाल्यावरील 25 लाखांच्या बंधाऱ्यास विरोध; विरोधकांचा विकास कामास विरोध
चोपडा l प्रतिनिधी
चोपडा विधान सभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे
यांच्या विशेष प्रयत्नांनी तालुक्यात विकासकामाची गंगा वाहत असताना प्रत्येक गावात वाडा वस्ती आदीवासी पाड्यात कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर होवुन सुरु असुन
काही ठिकाणी विरोधक मुद्दामहुन कामाना थांबवण्याचा प्रकार करत असुन अशाच प्रकार वर्डी येथील खडक्या नालावर आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतुन 25 लाखाचा बंधारा मंजुर होवुन भुमिपुजन झाले.
पंरतु त्या नाल्याजवळच शेतकऱ्यांना त्याची अडचण असल्यामुळे तेथील आदीवासी शेतकऱ्याने कामास सुरुवात केली असता त्या ठिकाणी विरोध दर्शविला व काम बंद पाडले.
त्यानंतर ठेकेदार व इंजिनियर त्याठिकाणी 5/6 वेळेस गेल्यावर काम करु दिले नाही त्यामुळे त्याठिकाणी ठेकेदारांला कुठलेही पेमेंट दिले गेले नाही.
पंरतु 2024 च्या हौशे उमेदवाराला आजच आमदार झाल्यासारखे वाटत असुन ते लोकांमध्ये चुकीचा मेसेज पसरवत आहेत.
अशा खोटारड्या उमेदवाराला जनताच धडा शिकवेल. खंरच आपल्या बुद्धीची किव कराविशी वाटते. बुधवारी स्वतः इंजिनियर व त्या भागातील शेतकरी बंधारा बांधत असलेल्या जागेवर जावुन तेथील सविस्तर परिस्थिती पाहीली.
शेतकऱ्यांसाठी हा बंधारा खुपच महत्त्वाचा असुन त्याठिकाणी निश्चितपणे भरपुर पाणी वाहते असुन त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली भुमिका परखड मत व्यक्त केले.
त्याप्रंसगी इंजि. कोतकर, माजी संरपच रवीद्र पाटील, कैलास बाविस्कर, सुरेश चव्हाण, भगवान बाविस्कर, रामालाल बारेला, भागवत कोळी, पांडुरग कोळी,
दादाभाऊ जव्हागे, राजमल बारेला, लोटन पाटील, विशाल धनगर, एकनाथ बारेला, मंगल इंगळे, सुरेश बारेला व परीसरातील शेतकरी उपस्थित होते.
हे हि वाचा👇
कोळन्हावी येथे 5 लाखाच्या कामाचे आ. सौ लताताई सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम