चोपडा बांधकाम विभागाचा कारभार चालतो नाशिकहून

कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा यांच्या अप डाऊन मुळे ठेकेदार त्रस्त

बातमी शेअर करा...
चोपडा बांधकाम विभागाचा कारभार चालतो नाशिकहून 
कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा यांच्या अप डाऊन मुळे ठेकेदार त्रस्त
जळगाव । प्रतिनिधी
चोपडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे गैरव्यवहार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून त्या विभागाच्या प्रमुख असलेल्या कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा ह्या नासिक वरून अप-डाऊन कारीत असल्याने
अनेक ठेकेदारांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात, आणि मॅडमच्या अनुपस्थितीत ठेकेदारांना उप विभागीय अभियंता, ऑडिटर व कनिष्ठ अभियंता यांची दाढी धरावी लागते.
ठेकेदार त्रस्त अधिकारी मस्त
चोपडा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे हे मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करुन मंत्रालयातुन कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणतात मात्र अधिकारी वर्ग त्याचा गैर फायदा घेत ठेकेदारांना
त्रस्त करीत असल्याचे फोन पे ने टक्केवारी घेण्याच्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.
रेल्वे वेळापत्रकानुसार चालतो चोपडा विभागाचा कारभार
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, चोपडा बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा या मुख्यालयी राहत नसून नाशिक येथून रेल्वे ने अप डाऊन करतात
तर उप विभागीय अभियंता विरेंद्र भ राजपूत हे देखील मुख्यालयी राहत नाहीत. यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल लोकेशन ची पडताळणी केली असता सत्य काय ते जनतेसमोर येईल.
कनिष्ठ अधिकाऱ्यांनाच गैरव्यवहार करण्याचे अलिखित अधिकार?
या सर्व प्रकारामुळे त्या कार्यालयाचे मालक हे ऑडिटर कुंदन कोळी, कनिष्ठ अभियंता बालाजी दहिफळे व शाखा अभियंता सोपान हेच मालक असल्याने त्यांना गैर व्यवहार करण्याचे जणू अलिखित अधिकारच प्राप्त झाले आहेत.
त्यामुळे हे सर्व अधिकारी मनमानी कारभार करण्यास मोकळे आहेत. त्यामुळे या विभागात विविध कामासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या ठेकेदारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
अधिक्षक अभियंत्यांच्या कारवाईकडे लक्ष  
दरम्यान कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा या आठवड्यातील 2-3 दिवसच नाशिक वरून जळगावी रेल्वेच्या टाईम टेबल नुसार येतात त्यामुळे या विभागाचा कारभार हा रेल्वेच्या टाईम टेबलनुसार चालतो असे म्हणण्यास हरकत नाही.
आणि त्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पी एस औटी यांच्या मर्जीतल्या असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. आणि जळगाव येथील काही महत्वाच्या खबरी देखील त्या नाशिकला देत असल्याची चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकाराकडे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे हे कारवाई करतील काय? याकडे लक्ष लागून आहे.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम