चोपडा येथे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात
१२०० विद्यार्थ्यानी नोंदवला सहभाग
चोपडा येथे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात
१२०० विद्यार्थ्यानी नोंदवला सहभाग
चोपड़ा I प्रतिनिधी
महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता सहावी व इयत्ता सातवी वर्गासाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी तिन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते.
सदर परिक्षा बालमोहन विद्यालयात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. इयत्ता दूसरी ते सातवीच्या एकूण १२०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सदर परीक्षेच्या बैठकीचे नियोजन एकूण ४९ ब्लॉक मध्ये करण्यात आले होते.
केंद्र संचालक म्हणून जळगाव येथील एस के पाटील यांनी काम पाहिले तर तालुका समन्वयक म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाचे आर डी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना बाळासाहेब पाटील,सचिन जैस्वाल, तुषार सूर्यवंशी, ललित सुतार , महाजन सर,वेदांत चौधरी यांचे सहकार्य लाभले.
परीक्षेचे पर्यवेक्षण राणी नाना वाघ ,सानिया सादिक पिंजारी, रोशनी दीपक जावळे ,दीक्षा भरत शिरसाठ,पूजा रामचंद्र बाविस्कर, अंजली तुषार पाटील ,देवयानी देविदास कोळी ,जिज्ञासा राजेंद्र चौधरी ,गेरुबाई गुमान बारेला ,सरिता रमेश महाजन, चैताली प्रकाश पाटील, भूमिका महेंद्र सैंदाणे ,हर्षदा गजानन पाटील, पायाल संजय बडगुजर ,साक्षी देवानंद शिंदे ,निशा गणेश जाधव, वैष्णवी गोपाल मराठे ,रोशनी बिलारसिंग बारेला, कबाबई तंट्या बारेला ,पुजा रतीलाल सुलताने, राजश्री समाधान धनगर ,भूमिका मंगेश जोशी वैष्णवी गोपाल पाटील, गुंजन नितीन धनगर ,दिशा विजय पाटील, सविता डोंगरसिंग बारेला, तेहसीन युनूस शेख, सय्यद तोकिया अंजुम आरीफ अली,समाधान राजू महाजन ,शुभम हिरालाल धनगर आदींनी पर्यवेक्षण केले. तर ऑब्झर्वर म्हणून अध्यापक विद्यालय चोपडाच्या रश्मी शेख यांनी काम पाहिले. पर्यवेक्षण कामी चोपडे शिक्षण मंडळ संचालित ,अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील सर व संजय देशमुख सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
परीक्षेसाठी इमारत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील , विजय दिक्षित, राकेश पाटील, मुख्याध्यापक प्रदिप चौधरी व रेखा पाटील, उत्कर्षा जोशी यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल एम टी एस परीक्षा आयोजकांनी आभार मानले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम