चोपडा वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. नितीन महाजन यांची निवड
एकूण 65 मतदारांपैकी तब्बल 46 जणांनी केले मतदान
चोपडा वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. नितीन महाजन यांची निवड
एकूण 65 मतदारांपैकी तब्बल 46 जणांनी केले मतदान
चोपडा i प्रतिनिधी
येथील चोपडा वकील संघ अध्यक्षपदाची निवडणूक आज दिनांक २० जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. नितीन मधुकर महाजन यांची तर उपाध्यक्ष पदासाठी ॲड. भैय्यासाहेब पाटील, सचिव ॲड प्रवीण पाटील, सहसचिव ॲड जामसिंग बारेला, खजिनदार ॲड शिवम पाटील म्हणून आदींची निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी एकूण 65 मतदारांपैकी तब्बल 46 जणांनी म्हणजेच 71% मतदान झाले. त्यामध्ये निवडणूक निकालात अध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार ॲड. नितीन मधुकर महाजन यांना तब्बल 43 मते मिळाली. सदर निवडणूकीकामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. संजय एम. बारी व ॲड. सुनील एन. बडगुजर यांनी काम पहिले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम