
चोपडा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी
आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी महत्वपूर्ण भेट:
चोपडा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी
आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी महत्वपूर्ण भेट:
जळगाव प्रतिनिधी I
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी भेट घेतली. या भेटीत चोपडा तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी लेखी स्वरूपात केली. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
1. निम्न तापी पाडळसरे प्रकल्पासाठी ५०० कोटी निधीची तरतूद: हा प्रकल्प येत्या ४ वर्षांत पूर्ण होण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद करावी.
2. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश: निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्याची मागणी.
3. खेडीभोकर-भोकर पुलाच्या कामासाठी निधी मंजुरी: अमळनेर बुडीत क्षेत्रातील पुलाचे काम जलदगतीने होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या निधीतून तातडीने १५ कोटी मंजूर करावे.
4. गुळ मध्यम सिंचन प्रकल्पासाठी भरपाई: या प्रकल्पांतर्गत भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी १४.५० कोटी निधीची तरतूद करावी.
5. गुळ मध्यम प्रकल्पासाठी शेतचाऱ्यांना सुविधा: शेतचाऱ्यांसाठी निधी मंजूर करावा.
6. माती धरणासाठी आधुनिक उपाययोजना: गुळ प्रकल्पाच्या धरणासाठी जलावरोधन आवरणासारख्या आधुनिक उपाययोजना करण्यासाठी निधी मंजूर करावा.
मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
प्रा. सोनवणे यांच्या मागण्यांवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी तत्काळ तापी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. मिलींद बोरकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून लवकरच या मुद्द्यांवर बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.
या भेटीमुळे चोपडा तालुक्यातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी मोठी आशा निर्माण झाली असून, भविष्यात शेतकरी व स्थानिक विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम