चोपड्यात गांजाची वाहतूक करणाऱ्या परभणीच्या दोघांना अटक
१ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त ' चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई
चोपड्यात गांजाची वाहतूक करणाऱ्या परभणीच्या दोघांना अटक
१ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त ‘ चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई
चोपडा प्रतिनिधी
शहरातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळ पोलिसांनी 14 किलो 510 ग्रॅम वजनाचा सुमारे एक लाख 45 हजार रुपये किमतीचा गांजा दोन रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पकडला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रोहित संजय शेळके वय 25 रा परभणी आणि तुळशीराम कचरू आवाडे वय 20 रा परभणी हे दोघे 2 फेब्रुवारी रविवार रोजी 14 किलो 510 ग्रॅम वजनाचा एक लाख 45 हजार रुपये किमतीचा गांजा२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वराड फाट्याजवळ घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम