
चोपड्यात कृषी बाजार समितीच्या विकासकामांचा शुभारंभ; शेतकऱ्यांच्या हितासाठी नवे प्रकल्प राबवणार
चोपड्यात कृषी बाजार समितीच्या विकासकामांचा शुभारंभ; शेतकऱ्यांच्या हितासाठी नवे प्रकल्प राबवणार
३९.७१ लाख रुपयांच्या ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन
चोपडा (प्रतिनिधी ) – चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी, व्यापारी आणि हमाल वर्गासाठी विविध कामे करण्यात आली असून, या विकासप्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी तब्बल ३९.७१ लाख रुपयांच्या ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामामुळे मुख्य मार्केट यार्डमधील गोडाऊन परिसरातील रस्त्यांची सुधारणा होणार असून, सर्व घटकांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम २८ रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक घनशाम अग्रवाल आणि जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम उपस्थित होते.
यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बाजार समितीच्या सभापती व संचालकांना शेतकऱ्यांच्या हितासाठी JCB घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच, काही नव्या योजनांसाठी पणन मंत्र्यांशी बैठक घेण्याची आणि नव्या योजना आणण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात रोहित निकम यांनीही मनोगत व्यक्त करत शेतकरी कल्याणासाठी समितीने उचललेल्या पावलांचे कौतुक केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये – माजी आमदार लता सोनवणे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक घनशाम अग्रवाल, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, कृ.उ.बा. समितीचे सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायक चव्हाण, भाजपचे मंडल अध्यक्ष कांतिलाल पाटील, नरेंद्र पाटील, पिंटू पावरा, मंगला पाटील, संध्या महाजन, स्वाती बडगुजर, अनिता शिरसाठ, मनिषा पाटील, शितल देवराज, सविता पाटील, कल्पना पाटील, रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, मनोज सनेर, मिलिंद पाटील, सुनिल जैन, सुनिल अग्रवाल, नंदकिशोर पाटील, नंदकिशोर सांगोरे, नितीन पाटील, रोहिदास सोनवणे, जितेंद्र देशमुख यांचा समावेश होता. व्यापारी, पदाधिकारी आणि शेतकरी बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम