चोपड्यात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष सत्कार समारंभाचे आयोजन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सन्मान

बातमी शेअर करा...

चोपड्यात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष सत्कार समारंभाचे आयोजन
विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सन्मान
चोपडा (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा व फेस्कॉम यांच्या वतीने महिला सन्मान व विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष समारंभ ८ मार्च २०२५ रोजी शनिवार, दुपारी ४ वाजता ज्येष्ठ नागरिक संघ भवन, श्री विठ्ठल मंदिरासमोर, नारायणवाडी, चोपडा येथे पार पडणार आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

अध्यक्ष स्थानी . सौ. छायाबेन रविंद्र गुजराथी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सौ. मोहिनी उपासनी (प्राध्यापिका, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळ, चोपडा) सौ. दिपिका साळुंखे (आरोग्य निरीक्षक, नगरपालिका, चोपडा) अॅड. सौ. किशोरी सागर नेवे (अॅडव्होकेट, चोपडा) उपस्थित राहणार आहे.

 

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

या समारंभासाठी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतला रमेश गुजराथी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. जयदेव निंबा देशमुख, फेस्कॉमच्या महिला अध्यक्षा सौ. ताराबाई दिलीपराव पाटील आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. विलास पंढरीनाथ पाटील यांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणाऱ्या या कार्यक्रमात प्रभावी महिला वक्त्यांचे प्रेरणादायी विचार, समाजसेवेतील कार्य आणि विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव होणार आहे. चोपड्यातील नागरिकांनी या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहून महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सर्व सन्माननीय कार्यकारी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम