
चोपड्यात ज्येष्ठ नागरिक संघाच्या आवारात प्लेवर ब्लॉक बसविण्याचे भूमिपूजन ७ एप्रिलला
माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांचा पुढाकार
चोपड्यात ज्येष्ठ नागरिक संघाच्या आवारात प्लेवर ब्लॉक बसविण्याचे भूमिपूजन ७ एप्रिलला
माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांचा पुढाकार
चोपडा प्रतिनिधी
माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या पुढाकाराने चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या खुल्या मोकळ्या आवारात प्लेवर ब्लॉक बसविण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन सोमवार, दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद बंधू-भगिनींनी संध्याकाळी ६.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक संघाच्या आवारात सुविधा वाढणार असून, याचा लाभ सदस्यांना मिळणार आहे. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम