
चोपड्यात पावसामुळे दुर्घटना : एक ठार, तिघेजण जखमी
चोपड्यात पावसामुळे दुर्घटना : एक ठार, तिघेजण जखमी
चोपडा (प्रतिनिधी) : शहरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतपुरा भागात एका घराची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. पहिल्या मजल्यावरील भिंत बाजूच्या घरावर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत मुसा खान उस्मान कुरेशी (वय ६१, रा. सय्यद वाडा, चोपडा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नजमाबी मुसा खान कुरेशी (५९), दिलकीशबी शिराज खान शेख रियाज (३५) आणि शिरीन बी इम्रान खान कुरेशी (३०) हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुसा खान यांचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. कर्त्या पुरुषाच्या मृत्युमुळे खान कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम