चोपड्यात ‘पुष्पा स्टाईल’ वृक्षतोड प्रकरण उघड; १५० हून अधिक सागवानी वृक्षांची अवैध कत्तल, अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप

बातमी शेअर करा...

चोपड्यात ‘पुष्पा स्टाईल’ वृक्षतोड प्रकरण उघड; १५० हून अधिक सागवानी वृक्षांची अवैध कत्तल, अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप

चोपडा (प्रतिनिधी) : सातपुडा पर्वतरांगातील हिरवाईला ‘पुष्पा स्टाईल’ने उद्ध्वस्त करण्याचे धक्कादायक प्रकरण चोपड्यात उघड झाले आहे. तालुक्यातील उमरटी येथील गोऱ्यापाडा परिसरात तब्बल १५० पेक्षा अधिक सागवानी वृक्षांची अवैध कत्तल झाल्याचा गंभीर आरोप संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांनी केला आहे.

३१ ऑगस्ट रोजी दुपारी अवैधरीत्या ट्रॅक्टरमधून सागवानी दांड्यांची उघडपणे वाहतूक होत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. या प्रकारामध्ये स्थानिक वनरक्षकांचा आशीर्वाद असल्याचा ठाम दावा करत पावरा यांनी जिओ-टॅग फोटो व व्हिडिओ पुरावे माध्यमांसमोर सादर केले.

फिर्याद नोंदवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. थोरात यांची भेट घेतली असता, “मी कोण आहे हे तुला माहीत आहे, पद सोडेन पण तुला दाखवतोच” अशा धमकीच्या स्वरूपातील विधान केल्याचा धक्कादायक आरोपही पावरा यांनी केला आहे. या संवादाचा व्हिडिओदेखील माध्यमांपर्यंत पोहोचल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट पसरली असून, “वनविभागाच्या आशीर्वादाने सातपुड्याची हिरवाई संपवली जात आहे” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. आता या गंभीर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणती ठोस कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम