
चोपड्यात फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
चोपड्यात फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा (Mobile Science Exhibition Unit)’ उपक्रमाला चोपडा तालुक्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २५ ते २६ ऑगस्टदरम्यान झालेल्या या दोन दिवसीय भेटीत सुमारे ९२९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोग, मॉडेल्स आणि प्रात्यक्षिकांद्वारे विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहात विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले आणि विज्ञानाबद्दलची त्यांची आवड व्यक्त केली.
या सहा संस्थांना दिली भेट
फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेने चोपडा शहरातील सहा शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. त्यात दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय आणि महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचा समावेश होता.
या शैक्षणिक भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रीती रावटोडे यांनी फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे समन्वयक डॉ. एस.एस. घोष यांच्याशी समन्वय साधला. या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. अमरदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय सैंदाणे, ऋषीकेश चौधरी, रोहित भोई, मयूर बंदे आणि राहुल हजारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाहनचालक गोरखनाथ बोरसे यांनीही सहकार्य केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम