चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का ;  शेकडो कार्यकर्त्यांचा आ.चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा...

चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का ; 
शेकडो कार्यकर्त्यांचा आ.चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा नगर परिषदेच्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठा झटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष परेश प्रतापराव देशमुख व सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष तथा पत्रकार मिलिंद देवराम सोनवणे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात चोपडा विधानसभेचे आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या शुभहस्ते दि.२१ रोजी पक्षप्रवेश केला.आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आ.सौ.लताताई सोनवणे या विकासशील नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करीत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.याप्रसंगी अशोक मराठे, ज्ञानेश्वर मराठे (मेजर),मनिष देशमुख, विवेक माळी,रिकेंश मराठे,परेश देशमुख,दिपक देशमुख,आबिद खान,करीम शेख,सादीक शेख, आसिफ खान,सुफीयान खान,आसिफ शेख,मजिद शेख,अर्शद खान,शाहीद खान, मुसाद्दीन शेख,रवि मराठे यांनी पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी बोलतांना परेश देशमुख म्हणाले की,मंत्री माणिकराव कोकाटे हे जिल्हा दौऱ्यावर आले असताना ‘एकला चलो रे’ असा नारा देत चोपडा नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढविण्याचे ठरविण्यात आले होते यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील घोषित केला होता.मात्र पक्षात नवीन प्रवेश झाल्याने अर्ध्या रात्री काय घडामोडी झाल्या आणि भाजप सोबत युती करण्याबाबत निर्णय झाला मात्र या निर्णयात व एबी फॉर्म संदर्भात आम्हाला विश्वासात न घेतल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा देत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे असे परेश देशमुख यांनी खान्देश अस्मिता न्यूज शी बोलताना सांगितले.
सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष व पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी सांगितले की, आम्ही पक्ष नेतृत्व अजित दादा पवार यांच्या सोबत पक्ष स्थापने पासुन होतो.चोपडा नगर परिषदेत पक्षाकडून उमेदवारी दाखल केली असताना आम्हाला एबी फॉर्म नाकारण्यात आले. त्यामुळे हा जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असून त्या अनुषंगाने आम्ही आमदार प्रा. सोनवणे यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक वार्डात जाऊन आम्ही प्रचारात प्रामाणिकपणे सक्रिय होणार आहोत असे मिलिंद सोनवणे यांनी पक्ष प्रवेशानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.याप्रसंगी प्रविण देशमुख,रमेश सोनवणे,ॲड. शिवराज पाटील,विजय पाटील,किरण देवराज कृउबा समिती संचालक,विकास पाटील,अनुप जैन,कैलास बाविस्कर,गणेश पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम