चोपड्यात रासेयो दिन उत्साहात साजरा’

बातमी शेअर करा...

चोपड्यात रासेयो दिन उत्साहात साजरा’

चोपडा (प्रतिनिधी) – येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे गीत स्वयंसेवकांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर होते.

तर प्रमुख व्याख्याते म्हणून रासेयो, विभागीय समन्वयक प्रा.डॉ.दिलीप गिऱ्हे उपस्थित होते, त्यांनी ‘राष्ट्रनिर्मितीत राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवकांची जबाबदारी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय, राज्य आणि विद्यापीठ स्तरीय कार्यक्रम आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याविषयी सखोल आणि विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.

प्राचार्य डॉ.सौंदाणकर यांनी अध्यक्षीय भाषणातून रासेयो विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विचारपीठावर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संबोधी देशपांडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे, कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल बाविस्कर, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.मोहिनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तद्नंतर कला व वाणिज्य महाविद्यालयातील करीना माळी, भावेश कोळी, जयश्री पाटील प्रतिक कोळी, नंदिनी सोनवने या रासेयो स्वयंसेवकांची माय भारत स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली व त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल बाविस्कर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम