चोपड्यात ‘राहुल स्ट्रीट फूड’ ला नवलसिंगराजे पाटील यांची भेट; उद्योजक राहुल पाटील यांचा सत्कार”

बातमी शेअर करा...

चोपड्यात ‘राहुल स्ट्रीट फूड’ ला नवलसिंगराजे पाटील यांची भेट; उद्योजक राहुल पाटील यांचा सत्कार”

चोपडा प्रतिनिधी ।

चोपडा शहरात नुकत्याच सुरू झालेल्या “राहुल स्ट्रीट फूड” या नवनवीन उपक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक मा. नवलसिंगराजे पाटील यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्टॉल मालक राहुल गजानन पाटील (मजरेहोळकर) यांचा सत्कार करून त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सौरव विजय पाटील यांच्यासह स्थानिक तरुण व सहकाऱ्यांची उपस्थिती होती. नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी नवलसिंगराजे पाटील यांनी आपुलकीने संवाद साधत शुभेच्छा दिल्या.

नव्या पिढीने व्यवसाय क्षेत्रात उतरून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या अशा छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणास हातभार लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चोपड्यातील या कार्यक्रमामुळे नव्या “राहुल स्ट्रीट फूड” ची उत्साही वातावरणात सुरुवात झाली असून, नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम