
चोपड्यात लवकरच ६ इलेक्ट्रिक बसेस; आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश
चोपड्यात लवकरच ६ इलेक्ट्रिक बसेस; आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश
चोपडा (प्रतिनिधी) | – आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चोपडा आगारात लवकरच ६ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील प्रवाशांना आता पर्यावरणपूरक, आधुनिक व शांत सफरीचा आनंद मिळणार आहे.
सध्या आगारात चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच या ई-बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अधिकृत माहिती आमदार कार्यालयाने दिली आहे.
यापूर्वीच चोपडा आगाराला ५ डिझेल बसेस मिळाल्या होत्या. तसेच, २ कोटींचा निधीही मिळवून चोपडा आगाराने राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. त्यामुळे बससेवेच्या सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, ग्रामीण व तालुकास्तरावर प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
या यशस्वी प्रयत्नांमुळे चोपडा आगारातील प्रवाशांच्या

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम