चोपड्यात शिवसेनेची ताकद वाढली ; चहार्डी व हातेड खुर्द येथील सरपंच, नगरसेवक व अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा...

चोपड्यात शिवसेनेची ताकद वाढली ; चहार्डी व हातेड खुर्द येथील सरपंच, नगरसेवक व अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

चोपडा प्रतिनिधी |
चोपडा तालुक्यात १६ रोजी शिवसेनेला मोठा राजकीय बळकटी देणारा प्रवेश सोहळा पार पडला. चहार्डी व हातेड खुर्द येथील सरपंच, नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, सहकारी संस्थांचे संचालक तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निरोप घेत कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे चोपडा शहरासह ग्रामीण भागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्र ठरले आहे.

या कार्यक्रमात चहार्डीच्या सरपंच सौ. चंद्रकलाताई दत्तात्रय पाटील, सविता युवराज पाटील (माजी पंचायत समिती सदस्य), चो. रमेश हिमंतराव पाटील (संचालक, तापी सहकारी सूतगिरणी), सौ. शालिनीताई रमेश पाटील (सरपंच, हातेड खुर्द), निलेश दत्तात्रय पाटील (माजी संचालक, चो.सा.का.), राहुल रमेश पाटील (उद्योजक, मुंबई), सचिन सुधाकर पाटील (माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस चोपडा), स्वाती मिलिंद बडगुजर (माजी शहर महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), तसेच सविता विनोद पाटील, भुषण पाटील, स्नेहल पाटील, निरंजन सोनवणे, साहेबराव शिरसाठ, मंगलदादा मोरे, माजी नगरसेवक हुसेन खा अय्युब खा, अकील जहागीरदार, मुख्तार सरदार, आसिफ सय्यद, जाकीर शेख, सलीम लायकभाई, शकील शेख, कादर मुरलीभाई, मुश्ताक शेख, मुनाप मोहसिन शेख, शब्बीरअली इनायतअली यांचा समावेश होता.

ग्रामीण भागातून अनेक ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे चोपडा तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

या प्रसंगी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांना तत्परतेने कामाला लागण्याचे आवाहन केले.

बैठकीत व्यासपीठावर माजी आमदार लताताई सोनवणे, कृ.उ.बा. चोपडा सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील, शिवराज पाटील, किरण देवराज, गोपाल पाटील, मुन्ना पाटील, उपसभापती कृ.उ.बा. यावल बबलू कोळी, सूर्यभान पाटील सर, राजेंद्र पाटील गंभीर सर, प्रताप आण्णा पावरा, विकासभाऊ पाटील, महेमूद बागवान, माजी नगरसेवक संध्याताई महाजन, मनिषा जैस्वाल, प्रकाश राजपूत, महेंद्र धनगर, सागर ओतारी, कैलास बावीस्कर, दिपक चौधरी, गोरख कोळी, सुकलाल कोळी, निलेश पाटील, स्वाती बडगुजर, प्रदीप बारी, राजेंद्र पाटील सर, प्रकाश रजाळे, इम्रान खाटीक, मंगल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठक उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली असून या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद चोपड्यात आणखी मजबूत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम