चोपड्यात २२ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान श्री व्यंकटेश बालाजी महाराजांचा पारंपरिक वहनोत्सव व रथोत्सव

बातमी शेअर करा...

चोपड्यात २२ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान श्री व्यंकटेश बालाजी महाराजांचा पारंपरिक वहनोत्सव व रथोत्सव

चोपडा (प्रतिनिधी): शहरातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा चारशे वर्षांहून अधिक परंपरा लाभलेला भव्य वहनोत्सव व रथोत्सव यंदा दि. २२ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्याबाबत माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी व विश्वस्तांनी दिली.

२२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वहनोत्सवात दररोज बालाजी महाराज वेगवेगळ्या वहनांवर आरूढ होऊन वाजत-गाजत मिरवणुकीने शहरातील विविध भागात भक्तांच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे या उत्सवाबाबत नागरिकांत प्रचंड उत्सुकता आहे.

वहनोत्सवाची दिनवार वहने

दि. २२: हत्ती (गांधी चौक, बाजारपेठ)

दि. २३: गरुड (मोठा देव्हारा, गणेश कॉलनी)

दि. २४: बत्तीस पुतळी (अरुणनगर, श्रीराम नगर)

दि. २५: गरुड (गुजर अळी)

दि. २६: नागोबा (सुंदरगढी)

दि. २७: मारोती (जबरेराम मंदिर, भाटगल्ली)

दि. २८: सूर्य (बडगजर गल्ली)

दि. २९: चंद्र (पाटील गढी, मल्हारपुरा)

दि. ३०: वाघ (गुजराथी गल्ली)

दि. १ ऑक्टोबर: मोर (रथगल्ली, बाजारपेठ)

दि. २ ऑक्टोबर: घोडा (चौधरी वाडा, जैन गल्ली)

वहन दररोज धार्मिक विधीनंतर रात्री ९ वाजता मंदिरातून मिरवणुकीस निघेल.

३ व ४ ऑक्टोबरला भव्य रथोत्सव

खान्देशात ख्यातनाम असलेला रथोत्सव दि. ३ व ४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

दि. ३ ऑक्टोबर सकाळी १० वाजता गोलमंदिराजवळून रथयात्रेला प्रारंभ होईल. मार्गात आशा टॉकीज, श्री आनंदी भवानी मंदिर, आठवडे बाजार, पाटील दरवाजा मार्गे रथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी राहील. तेथे रात्रभर दर्शनासाठी रथ खुला असेल.

दि. ४ ऑक्टोबर सकाळी १० वाजता रथ परतीच्या प्रवासाला निघून गोलमंदिराजवळ पोहोचेल आणि या वर्षीच्या सोहळ्याचा समारोप होईल.

या पारंपरिक उत्सवामुळे चोपडा शहरात सध्या उत्साहाचे वातावरण असून, बाहेरगावाहूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम