चोपड्याला कानबाई उत्सव व विसर्जन उत्साहात

बातमी शेअर करा...

चोपड्याला कानबाई उत्सव व विसर्जन उत्साहात

चोपडा (प्रतिनिधी) – एस. के. नगर, चोपडा येथे प्रथमच कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दशामाता आणि दुसऱ्या रविवारी कानबाई (रोट) पूजा पार पडली.

कानबाई निमित्त कॉलनी परिसरातून वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील महिलांनी महेंद्र कानडे यांच्या नवीन घरात कानबाईची स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली. या पूजेस सौ. धनश्री महेंद्र कानडे यांनी मुख्य यजमान म्हणून सहभाग घेतला.

उत्सवामध्ये एस. के. नगर परिसरातील सुषमा शशिकांत कानडे, जयश्री चंद्रकांत कानडे, मानसी कानडे, मालू कंखरे, यूगा नितीन महाजन, चेतना महाजन, संपदा श्रीकांत जाधव, शितल वारडे, तेजस्विनी सावकारे, कल्याणी महाजन, सुनिता चौधरी, मेघा बाविस्कर, पुष्पा चौधरी यांच्यासह शेकडो महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कानबाईची स्थापना विशेषतः महेंद्र कानडे यांच्या नवीन वास्तूत करण्यात आली होती. अडावद परिसरातूनही काही कुटुंबांनी या धार्मिक कार्यात सहभागी होऊन श्रद्धेने सहभाग नोंदवला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम