चोर म्हटल्याच्या संशयावरून एकाच्या डोक्यात टाकला झारा 

जळगाव रेल्वे स्थानकाजवळील घटना

बातमी शेअर करा...

चोर म्हटल्याच्या संशयावरून एकाच्या डोक्यात टाकला झारा 

जळगाव रेल्वे स्थानकाजवळील घटना

जळगाव प्रतिनिधी

शहरातील रेल्वे स्थानक परिसरात ११ मे रोजी रात्री एक धक्कादायक घटना घडली. गेंदालाल मिल परिसरात राहणारे विशाल भाऊसाहेब मोरे यांचा मुलगा मोबाईल चार्जिंगसाठी रेल्वे स्थानकाजवळील एका पानटपरीवर गेला होता. तिथे उपस्थित असलेल्या दोन जणांनी त्याला “तू चोर आहेस” असे म्हणत संशय घेतला. हा आरोप ऐकून विशाल मोरे यांनी त्या दोघांना जाब विचारला.

मोरे यांनी जाब विचारताच त्या दोघांचा पारा चढला आणि त्यांनी वाद घालत विशाल मोरे यांना शिवीगाळ केली. वाद विकोपाला गेल्यावर, त्या दोघांनी पानटपरीवर भजे तळण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी झारा उचलला आणि थेट विशाल मोरे यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर विशाल मोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र पाटील करत आहेत. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम