चौगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

चौगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील चौगाव परिसरात पुन्हा एकदा आत्महत्येच्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून २२ नोव्हेंबर रोजी नरू जाधव (वय ३३) यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घरातील मंडळींना ही घटना उशिरा उघडकीस आली. तातडीने त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीवरून ही घटना वैयक्तिक नैराश्यातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम