
छगन भुजबळांच्या उपस्थितीत होणार 22 मार्च रोजी जळगाव मध्ये ओबीसी समाजाचा महामेळावा
महामेळाव्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात महात्मा फुले समता परिषदेतर्फे बैठक
छगन भुजबळांच्या उपस्थितीत होणार 22 मार्च रोजी जळगाव मध्ये ओबीसी समाजाचा महामेळावा
महामेळाव्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात महात्मा फुले समता परिषदेतर्फे बैठक
जळगाव प्रतिनिधी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दि. २२ मार्च रोजी जळगाव येथे ओबीसी समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या १५० महिलांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना, जळगावातील या मेळाव्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. बैठकीत मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्या गठित करण्याचे ठरविण्यात आले. या प्रसंगी ओबीसी समाजातील सर्व जाती-धर्मांचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीस आमदार राजुमामा भोळे, दशरथ महाजन, अशोक खलाणे, गुलाबराव वाघ, भानुदास हिलाल महाजन, रविंद्र एकनाथ महाजन, विजय पंढरीनाथ महाजन, संतोष बळीराम माळी, राजेंद्र रंगराव महाजन, गुलाबराव रतन वाघ, प्रतिभा शिरसाठ, आशाताई अंभोरे, छाया माळी, सोनाली देऊळकर, अभिलाषा रोकडे, प्रा. डॉ. जतिन मेढे (अ. भा. म. फुले समता परिषद तालुका अध्यक्ष भुसावळ), संघरत्न महेंद्र सपकाळे, रविंद्र माळी, सुनिल माळी, प्रमिला रोकडे, मिना महाजन, यशवंत शिंपी, सारीका शिंपी, भारती कुमावत, अर्चना माळी, मंगला विजय महाजन, कृष्णा माळी, वसंत पाटील, चेतन अढळकर, जतिन सोनार, किशोर सुरेश माळी, किशोर अर्जुन कपले, दिगंबर संतोष बोरसे, भगवान महाजन, कैलास जाधव, भगवान रोकडे, प्रकाश महाजन, राकेश कंडारे आदी उपस्थित होते.
या महामेळाव्यामुळे ओबीसी समाजाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची आणि त्यांच्या हक्कांसाठी पुढील दिशा ठरविण्याची अपेक्षा आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम