छत्तीसगड येथे चार जहाल नक्षलींचे आत्मसमर्पण
चारही नक्षलवाद्यांवर प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस
नारायणपूर I प्रतिनिधी
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात बुधवारी चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. हे नक्षलवादी ४०हून अधिक नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी होते.
चारही नक्षलवाद्यांवर प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस होते. अमानवीय माओवादी विचारसरणी आणि वरिष्ठ नक्षलवाद्यांकडून निर्दोष आदिवासींच्या होणाऱ्या शोषणामुळे निराश होऊन त्यांनी आत्मसमर्पण केल्याचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले.
आत्मसमर्पण करण्याच्या या नक्षलवाद्यांच्या निर्णयामुळे माओवाद्यांच्या नेलनार आणि आमदई एरिया कमिटीला मोठा झटका बसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे
. प्रशासनाकडून या चारही नक्षलवाद्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून सरकारी धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल. गतवर्षी बस्तर क्षेत्रात ७९२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम