छत्तीसगडमध्ये चकमकीत ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान
इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात शोध मोहीम
बिजापूर I वृत्तसंस्था
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात रविवारी पोलिसांना मोठे यश आले आहे, अशी माहिती बस्तर भागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली आहे.
जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी) व विशेष कृती दल (एसटीएफ) आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांच्या संयुक्त पथकाने इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात शोध मोहीम राबवली. यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार करीत आगळीक केली. त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम