
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बालिश विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांना बालसुधारगृहात पाठवावे
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बालिश विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांना बालसुधारगृहात पाठवावे
प्रजा शक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा . अशोराज तायडे यांची निवेदनाद्वारे मागणी
जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मुख्यमंत्री यांनी कायदेशीर कार्यवाही करावी तसेच राहुल सोलापूर यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर ला सरकार ने ताब्यात घेऊन, ह्या मागचा बोलता धनी कोण आहे हे ही सरकार ने शोधावे, राहुल सोलापूरकर चे वक्तव हे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला गाल-बोट लावणारे आहे. महायुती सरकार ने राहुल सोलापूरकर ला पाठीशी न घालता त्याच्यावर कार्यवाही करावी खरेतर बालिश विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरला बालसुधारगृहात पाठवावे. ह्या मागणीचे निवेदन प्रजाशक्ती क्रांती दलाकडून काल जळगाव जिल्हाधिकारी द्वारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले.प्रा . अशोराज तायडे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रजाशक्ती क्रांती दल
यांनी कळविले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम