छत्रपती शिवरायांचा आदर्शवाद आत्मसात करुन युवकांचे संघठन मजबुत करा ..माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा  

शहापुर येथे शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

बातमी शेअर करा...

छत्रपती शिवरायांचा आदर्शवाद आत्मसात करुन युवकांचे संघठन मजबुत करा ..माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा  

शहापुर येथे शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
  खामगाव ः– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  शौर्य,साहस, पराक्रमाची व कुशल संघठनाची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. शिवरायांचे  युद्ध धोरण, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभार चालवितांना कधीही जातीयवाद मानला नाही, स्वराज्याची स्थापना करत असतांना त्यांनी सर्व  जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत  घेतले होते.त्यांचे अंगरक्षक म्हणुन काम पाहणारे सिध्दी इब्राहिम व तोफखाना प्रमुख इब्राहिम खान हे शिवरायांचे विश्वासू होते. ज्या ठिकाणी जनतेवर अन्याय होत असेल त्या  अन्यायाविरोधात आवाज उठवुन शिवरायांनी जनतेला नेहमी न्याय दिला. एक आदर्श राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय होय. छत्रपतीचा तोच आदर्शवाद आत्मसात करुन  शहापूर येथील आपले संघठन अधिक मजबुत करुन आपल्या गावाचा उत्कर्ष साधावा असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी खामगाव तालुक्यातील शहापुर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त आवाहन केले.
यावेळी मंचावर सत्कारमुत म्हणुन सावित्रीबाई फुले विद्यालय शहापुरचे क्रिडा शिक्षक सिध्देश्वर धनोकार सर, प्रतिष्ठीत नागरीक प्रल्हाद तराळे, शहापुर ग्राम पंचायतच्या सरपंचा सौ.सरस्वतीताई बदरखे,खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती चैतन्य पाटील, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले,विदर्भ हौशी कबडड्ी असो.चे अशोकबाप्पु देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी आमदार नानाभाऊ कोकरे, विदर्भ प्रांत बजरंग दलाचे माजी अध्यक्ष अमोल अंधारे,खामगाव तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र बघे,शहापुरचे पोलीस पाटील प्रमोद ताले,अनिलभाऊ भुसारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, शहापूर येथील शिवभक्त मंडळाच्या तरुण युवकांनी, वडीलधारी मंडळींनी,सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन वर्गणी गोळा करून गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जिर्णोद्धार केला आहे.खासदार निधीतून सुध्दा या सौंदयकरणाच्या कामासाठी निधी देण्यात आल्यामुळे भव्यदिव्य शिवरायांचा अश्वारुढ पुतळा आणि परिसराच्या  आकर्षक सौंदयकरणामुळे  शहापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.गावकऱ्यांनी या परिसराची निगा राखुन छत्रपती शिवरायांच्या पुतळयाचे पावित्र्य जपावे असे सांगुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचे कौतुक केले व उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी सुध्दा मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, छत्रपती शिवरायांनी राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या प्रेरणेने प्रतिकुल परिस्थितीमध्ये बलाढ्य शत्रुंसमोर आवाहन उभे करत स्वराज्याची निर्मिती केली.छत्रपती शिवराय हे आदर्श राजे होते असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी गजानन तिडके यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते होते.त्यांचे पाईक म्हणुन आम्ही सर्वजण गावाच्या विकासासाठी सदैव सोबत राहुन एकजुटीने काम करु असे त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे शहापूर गावात आगमन झाले असता शिवभक्त मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व शहापुर ग्राम पंचायतच्या सरपंचा सौ.सरस्वतीताई बदरखे यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करुन  छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली व जयंतीनिमित्त राजेंना मानवंदना देण्यात आली. यावेळी आयोजकांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शाल श्रीफळ व भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच गावात विद्यादानाचे पवित्र कार्य करून उत्कृष्ट भावी पिढी घडविल्याबद्दल सत्कारमुत सावित्रीबाई फुले शहापुर विद्यालयाचे क्रिडा शिक्षक सिध्देश्वर धनोकार सर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व छत्रपती शिवरायांची आकर्षक मूत भेट देऊन  आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला  तसेच  उपस्थित सर्व मान्यवरांचा सुद्धा आयोजकांच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची नेत्रदिपक  अशी आतिषबाजी करून शिवजयंतीचा जल्लोष साजरा करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी , छत्रपती शिवाजी महाराज की जय, हम सब एक है अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचलन प्रमोद ताले सर यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर बदरखे यांनी केले.
हा शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी पंकज भुसारी, गणेश ताले,विश्वनाथ तिजारे,मनोहर बदरखे, केशव माडोकार,गणेश भुसारी,शिवा ताले,शुभम कांजरकर,अक्षय बदरखे, दत्ता कुचर,शिरू तिजारे,अनंत अढाव,शुभम टिकार,दत्ता मेतकर गजानन मेतकर,संदीप तिजारे,ऋषी बदरखे, गजानन बदरखे, दत्ता नेमाडे, विठ्ठल मेतकर , गौरव बदरखे, दीपक धोत्रे , अभिजीत पाटील , संदीप पाटील , विश्वनाथ वाडेकर ,प्रफुल तिडके, पवन पनपालिया,अतिश पळसकार, रमेश कदम , भास्कर कोगदे , भूषण भुसारी , नागेश बदरखे ,संकेत अडसणे, विशाल अडसणे, शुभम तिजारे , अजय सोनोने, संजय बदरखे, मुकेश अढाव,दत्ता गावंडे,किसना कोगदे ,विजय मोरखडे , सार्थक पाटील,  सुदर्शन लाहुडकार,  सुरेश मेतकर,  गजानन पळसकार,अजय भारसाकडे , शिवा गवळी,संतोष अढाव,  हरीश पाचपोर,  विठ्ठल कारंजकर , साहिल मानकर, महेश मेतकर,  गजानन कल्याणकर, सुधीर भट्टड यांच्यासह शहापूर येथील शिवभक्त मंडळाचे तरुण कार्यकर्ते पदाधिकारी व गावकरी बांधवांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम