छत्रपती शिवाजी नगरातील ड्रेनेज समस्येमुळे रहिवासी त्रस्त; माजी नगरसेवकांचे मनपाला साकडे

बातमी शेअर करा...

छत्रपती शिवाजी नगरातील ड्रेनेज समस्येमुळे रहिवासी त्रस्त; माजी नगरसेवकांचे मनपाला साकडे

 

अपुरी यंत्रणा आणि मनुष्यबळामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त

 

जळगाव : शहराच्या प्रभाग क्रमांक २ मधील छत्रपती शिवाजी नगर परिसरात ड्रेनेज लाईन आणि सांडपाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांनी जळगाव महानगरपालिकेला निवेदन दिले आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

निवेदनानुसार, मनपाने दिलेल्या आवाहनानंतर काही रहिवाशांनी आपल्या घरातील सांडपाण्याचे पाईप ड्रेनेज लाईनला जोडले आहेत. मात्र, मनपा प्रशासनाकडे या ड्रेनेज लाईनच्या साफसफाईसाठी आवश्यक असलेले ‘जेटिंग मशीन’ आणि पुरेसे सफाई कामगार उपलब्ध नाहीत. त्यामुळे सांडपाणी आणि मैला चेम्बरमध्येच साचून राहत आहे.

दारकुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “एकीकडे नागरिक मनपाच्या सूचनांचे पालन करत आहेत, तर दुसरीकडे अपुऱ्या मनुष्यबळामुळे व यंत्रणेअभावी ड्रेनेजमध्ये साचलेल्या पाण्यामुळे विषारी वायू निर्माण होत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्यासोबतच मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी दारकुंडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम