छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत देदीप्यमान यश

बातमी शेअर करा...

छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत देदीप्यमान यश

 

धुळे: महाराष्ट्र जंप रोप असोसिएशनतर्फे नुकत्याच नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय जंप रोप फेडरेशन कप अजिंक्यपद स्पर्धांमध्ये धुळे येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव रोशन केले आहे. हरणमाळ येथील या शाळेच्या एकूण १५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यापैकी ११ विद्यार्थ्यांनी पदकांवर नाव कोरले.

या स्पर्धेत प्राजक्ता जितेंद्र पवार हिने सुवर्णपदक पटकावले, तर श्रद्धा सुनील निकम हिने रोप्यपदक आणि समृद्धी ईश्वर ठाकरे हिने कांस्यपदक मिळवले.

३० सेकंद रिले प्रकारात रिद्धी सुनील उदीकर, साक्षी मनोहर सोनवणे, यशस्वी सुनील निकम आणि आरोही नितीन सोनगरे या संघाने रोप्यपदक जिंकले. तसेच, याच प्रकारात रोहन प्रवीण पाटील, दर्शन प्रमोद पाटील, जय राकेश नाईक आणि पार्थ प्रदीप पाडवी यांच्या संघाने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन सुभाषदादा देवरे, प्रकल्प समन्वयक एस. बी. पाटील, आणि शाळेचे प्राचार्य आशिष काटे यांनी अभिनंदन केले. त्यांना क्रीडा शिक्षक राजेश मोरे आणि हेमराज भामरे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम