छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

धुळे: श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल, हरण माळ येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री एस. बी. पाटील सर उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री एस. बी. पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री आशिष काटे सर, श्री बोरसे भाऊसाहेब, श्री विजय पाटील सर, श्री अभय जैन सर आणि श्री नामदेव जगताप तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण श्री एस. बी. पाटील सर आणि प्राचार्य श्री आशिष काटे सर यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि संगीत सादर केले.

महाराष्ट्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत, दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण तिरंगा रॅली आणि डान्स कार्यक्रम होते, ज्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम