छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चोपडा प्रतिनिधी l – राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाअंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांसाठी एकत्रित महसूल व शासकीय सेवा शिबिराचे भव्य आयोजन चहार्डी येथे करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध शासकीय योजनांचे लाभ, अनुदान व धनादेश प्रदान केले.

या शिबिरात १४०० ते १५०० नागरिकांनी सहभाग घेत विविध योजनांचा लाभ घेतला. महसूल, आरोग्य, ग्रामविकास, वीज वितरण, जलपुरवठा, कृषी आदी विभागांच्या एकत्रित सहभागामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच सर्व सेवा सुलभतेने मिळाल्या. यामुळे शासन व प्रशासनाविषयी सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली.

 

शिबिरासाठी पणन महासंघाचे उपाध्यक्ष श्री रोहित दादा निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब पाटील, प्रकाश रजाळे (घोडगाव), सरपंच चंद्रकला ताई पाटील (चहार्डी), विनोद पाटील, बंडू चौधरी, किरण पाटील, जगदीश पाटील, दीपक बिऱ्हाडे, भूषण रायसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अनिल विसावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विरेंद्र राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, महावितरणचे अभियंते, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तसेच सर्व तालुका स्तरीय अधिकारी व मंडळस्तरावरील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व समारोप:

शिबिराचे संचालन श्री. भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय चोपडा) यांनी प्रभावीपणे पार पाडले.

शिबिराची विशेष नोंद – या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या गावातच शासकीय सेवा सहज मिळाल्या. नागरिकांच्या तोंडून प्रशासनाविषयी समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम