
छत्रपती शिवाजीनगर येथे श्री भागवत सप्ताह समाप्तीनिमित्त शिवजयंती मिरवणूक
भगवे फेटेदारी महिलांनी वेधले लक्ष
छत्रपती शिवाजीनगर येथे श्री भागवत सप्ताह समाप्तीनिमित्त शिवजयंती मिरवणूक
भगवे फेटेदारी महिलांनी वेधले लक्ष
जळगाव प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीनगर मधील माजी नगर सेवक नवनाथ दारकुंडे तसेच गणेश क्रीडा संस्था श्री दत्तगुरु मित्र मंडळ श्री माऊली महिला बचत गट यांच्या माध्यमातून दिनांक १२ ते १९ पर्यंत श्री भागवत सप्ताह याचे आयोजन केले होते. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सप्ताह समाप्ती व शिवजयंती मिरवणूक एकीकरण करून माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या घरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रपती शिवाजीनगर मध्ये अर्धाकृती पुतळा त्या ठिकाण पर्यंत भव्य दिव्य मिरवणूक सकाळी १२ ते ५ वाजेपर्यंत काढण्यात आली होती. या प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक वर्ग व महिलावर्ग असंख्य संख्येने भगवे फेटे प्रधान करून असंख्य संख्येने त्यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून सर्व भक्तांनी त्या ठिकाणी मानवंदना दिल्या त्यावेळी प्रभागातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे व संस्थेचे अध्यक्ष अतुल हाडा , सिद्धार्थ दारकुंडे, स्वप्निल दारकुंडे, सागर दारकुंडे, एकनाथ दारकुंडे, आजिनाथ दारकुंडे, अमोल दारकुंडे, संजय अकोलकर, संजय शिंपी ,श्रीकांत होले ,पंकज होले आणि महिला मंडळ अध्यक्ष जोशना दारकुंडे ,पायल हराळ ,आशा पोळ, रेखा नेरकर हेमलता दलाल, छाया शिंपी ,वैष्णवी घाडगे ,अर्चना शोले ,शितल शिंपी, चित्रा सोनवणे, सरला विश्वकर्मा ,कल्पना सोनार, आशा पोळ, लता निळे ,यासह असंख्य संख्येने महिला वर्ग व नागरिक वर्ग भव्य दिव्य मिरवणूक मध्ये सहभागी झाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम