छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन

शाळेच्या भविष्यातील योजना आणि ध्येय धोरणे सादर

बातमी शेअर करा...

छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन

शाळेच्या भविष्यातील योजना आणि ध्येय धोरणे सादर
धुळे प्रतिनिधी
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल, हरणमाळ, धुळे मध्ये दि. 28 फेब्रुवारी 2025 , शुक्रवार रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विज्ञान प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे चेअरमन दादासाहेब शिवाजीरावजी देवरे यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे चेअरमन सुभाषरावजी देवरे, पंजाब नॅशनल बँकचे मुख्य व्यवस्थापक श्री वीरेंद्र यादव, प्रकल्प समन्वयक एस बी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक आशिष काटे, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी Sustainable Development Goals, Sustainable water management, चंद्रयान – 3, आरोग्य आणि सक्रिय जीवनशैली, तसेच भारतातील प्राचीन व आधुनिक औषध शास्त्र यावर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. हे प्रकल्प विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि ज्ञानाला चालना देणारे होते. विद्यार्थी व पालकांना विज्ञानावर आधारित तारांगण शो देखील दाखवण्यात आला.

या कार्यक्रमात शाळेत 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी चौथे पालक-शिक्षक बैठकीचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. आशिष काटे यांनी शाळेच्या भविष्यातील योजना आणि ध्येय धोरणे सादर केली, तसेच पालक आणि शिक्षक यांच्या सहयोगाचे महत्त्व सांगितले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्कूलचे चेअरमन, सुभाषदादा देवरे, प्रकल्प समन्वयक, श्री एस बी पाटील सर, आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री आशिष काटे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कौतुक केले. भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम