
छेड काढल्याच्या संशयावरुन डिलिव्हरी बॉयला जमावाने बदडले
छेड काढल्याच्या संशयावरुन डिलिव्हरी बॉयला जमावाने बदडले
जळगाव : लिफ्टमध्ये छेड काढल्याच्या संशयावरुन पार्सल देण्यासाठी गेलेल्या डिलीव्हरी बॉयला जमावाने बेदम चोप दिला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास महामार्गावरील वासुकमल अपार्टमेंटमध्ये घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत डिलीव्हरी बॉय तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
शहरातील महामार्गालगत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास पार्सल देण्याकरीता एक डिलीव्हरी बॉय गेला होता. लिफ्टने तो पार्सल देण्याकरीता जात असतांनालिफ्टमध्ये बसलेल्या लहान मुलीची त्याने छेड काढली. हा प्रकार तरुणीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला जाब विचारला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी डिलीव्हरी बॉय तरुणाला पब्लिक मार दिला. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
छेड काढल्याच्या संशयावरुन तरुणाला पब्लिक मार होत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संतप्त पब्लिकच्या तावडीतून तरुणाची सुटका करीत ताब्यात घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम