छेड प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतली कठोर भूमिका

विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली

बातमी शेअर करा...

छेड प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतली कठोर भूमिका
विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली
मुंबई प्रतिनिधी

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जळगावमधील मुक्ताई यात्रेत रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची टवाळखोरांनी छेड काढली. ही घटना उघड होताच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणावर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही कठोर भूमिका घेतली आहे.

या घटनेवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या, “या प्रकरणाकडे मी स्वतः लक्ष देत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल. ही विकृती समाजातून नष्ट झाली पाहिजे. यापूर्वी त्या टवाळ खोरवर गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगारांचे चेहरे लोकांसमोर आणले पाहिजेत. केवळ काळे कपडे घालून निषेध करण्यापेक्षा, त्यांना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे.असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. ”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम