जन्म प्रमाणपत्र प्रकरण : किरीट सोमय्या यांच्या दबावाखाली निर्दोष नागरिकांवर अन्याय; एकता संघटनेचा तीव्र विरोध

बातमी शेअर करा...

जन्म प्रमाणपत्र प्रकरण : किरीट सोमय्या यांच्या दबावाखाली निर्दोष नागरिकांवर अन्याय; एकता संघटनेचा तीव्र विरोध

जळगाव शहरातील जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दबावाखाली ४३ निर्दोष नागरिकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचा आरोप होत असून, याविरोधात जळगाव जिल्हा एकता संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

या प्रकरणात अनेक निर्दोष नागरिकांवर अन्याय्य आरोप ठेवण्यात आले असून, यासंदर्भात जळगाव जिल्हा एकता संघटनेने सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक तसेच मुख्यमंत्री, राज्य मानवाधिकार आयोग आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांना निवेदन दिले.

चौकशीत हे स्पष्ट झाले आहे की अर्जदार हा एक सामान्य नागरिक असून त्याने कोणतेही बनावट कागदपत्र तयार केलेले नाहीत. उलट वकील/एजंट यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे हा प्रकार घडला. तरीही प्रशासन निर्दोषांवर कारवाई करत आहे, हे धक्कादायक व अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राजकीय लाभासाठी आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी या प्रकरणात अनावश्यक गोंधळ निर्माण केल्याचे संघटनेने आरोप केले. त्यांच्या वर्तनामुळे निर्दोष महिला-पुरुषांना मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक त्रास सहन करावा लागत आहे. हे वर्तन लोकशाहीस कलंक असल्याचे एकता संघटनेने स्पष्ट केले.

एकता संघटनेच्या ठाम मागण्या :
१) ४३ निर्दोष नागरिकांवरील सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
२) या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
३) निर्दोष नागरिकांचा छळ थांबवून त्यांना न्याय द्यावा.
४) राजकीय दबाव टाकणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी.

संघटनेचे संयोजक फारूक शेख यांनी इशारा दिला की प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास एकता संघटना मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारेल.

प्रतिनिधी मंडळात सहभागी होते :
मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, फारूक शेख, मतीन पटेल, मौलाना गुफरान शेख, बबलू पटेल, आरिफ देशमुख, चिरागोद्दीन शेख, सैयद जमील, रझाक पटेल, रहीमुद्दीन आदी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम