
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी, १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी, १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती
उत्तराखंडच्या धरालीसारख्या दुर्घटनेने मचैल माता यात्रा मार्गावर हाहाकार
जम्मू-काश्मीर: उत्तराखंडमधील धराली येथील नैसर्गिक आपत्तीची आठवण करून देणारी एक दुर्दैवी घटना जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. येथील पद्दर उपविभागातील चिशोटी गावात मचैल माता यात्रा मार्गावर ढगफुटीमुळे आलेल्या पुरात १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
बचावकार्य सुरू, मदत पथक रवाना
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. त्यांनी स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याची शक्यता आहे. बचाव पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली असून, मदत आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याची व्यवस्था केली जात आहे.
या दुर्घटनेनंतर अनेक लोक बेपत्ता असल्याने, त्यांचा शोध घेतला जात आहे.
उपराज्यपालांकडून तीव्र दुःख व्यक्त
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांप्रति त्यांनी दुःख व्यक्त केले असून, जखमींना लवकर आराम मिळावा यासाठी प्रार्थना केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम