
जयदेव नाना देशमुख आणि प्रमोद डोंगरे यांची शहर उपजीविका समिती सदस्यपदी निवड
विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदन
जयदेव नाना देशमुख आणि प्रमोद डोंगरे यांची शहर उपजीविका समिती सदस्यपदी निवड
विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदन
चोपडा (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा अध्यक्ष जयदेव निंबाजी देशमुख आणि माजी सचिव प्रमोद शंकर डोंगरे यांची चोपडा नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत (DAY-NULM) शहर उपजीविका कृती आराखडा (C-LAP) तयार करण्यासाठी गठित समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीच्या निमित्ताने देशमुख आणि डोंगरे यांचे शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडाचे सचिव विलास पंढरीनाथ पाटील यांनी दोघांचाही सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम