जळगाव शहरात अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील यांचा विकासाचा अजेंडा; मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
विकासाच्या वचनांनी मतदार उत्साहित
जळगांव l प्रतिनिधी
येथील जळगाव शहर विधानसभेचे अपक्ष उमेदवार आणि माजी उपमहापौर कुलभूषण वीरभान पाटील यांना पिंप्राळा परिसरासह संपूर्ण शहरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
त्यांच्या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात पिंप्राळा आणि आजूबाजूच्या परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयी-सुविधा यासारख्या मूलभूत गरजांवर विशेष लक्ष देत
त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा जोरदार धडाका लावला होता. या कामांच्या जोरावर आज पिंप्राळा परिसरासह त्यांना जळगांव शहरातील विविध प्रभागांमधून मतदारांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे.
कुलभूषण पाटील यांनी उपमहापौर असतांना पिंप्राळ्यात अनेक मूलभूत सुविधा पुरवल्या असून त्यांच्या नेतृत्वात अधिक विकासाची आशा स्थानिक जनतेने व्यक्त केली आहे.
शहराच्या इतर भागांमध्येही त्यांनी सामाजिक कार्य आणि विकासकामांवर भर दिला असल्याने, जळगाव शहरातील मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांची मतदारांकडून सराहना होत आहे.
त्याचेच फलित म्हणून त्यांच्या प्रचारादरम्यान मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद दिसत असून, पिंप्राळा परिसरासह शहरातील इतर भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रचार सभा व रॅली मध्ये सहभागी होत आहेत.
विकासाची ही पावले आणि कार्यक्षमतेमुळे पिंप्राळा परिसरातील नागरिकांचे त्यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे प्रचारात त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंप्राळा आणि जळगाव शहराचा विकास अधिक गतीने होईल,
अशी स्थानिक मतदारांना अपेक्षा आहे. तर जळगांव शहराच्या विकासासाठी ही माझी लढाई आहे, त्यासाठी मतदारांनी मला प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे असे आवाहन कुलभूषण पाटील यांनी जळगांव शहर वासियांना केले आहे.
त्यांच्या नेतृत्वात शहराच्या विविध भागांतील प्रश्न सोडवले जातील आणि विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी आशा मतदारांना आहे.
कुलभूषण पाटील यांच्या अनुभवाचा लाभ जळगाव शहराच्या विकासासाठी उपयोगी ठरेल, अशी स्थानिक जनतेची भावना आहे. जळगांव करांच्या प्रत्येक कसोटीत खरा उतरणारा चेहरा म्हणजे कुलभूषण पाटील होय, अशी प्रतिक्रिया हरिविठ्ठल नगर मधील एका मतदाराने बोलून दाखवली.
तर जनतेच्या मनातील खरा आमदार आणि जनसेवक हा कुलभूषण भाऊच असल्याचे पिंप्राळ्यातील एका जेष्ठ नागरिकाने बोलून दाखविले.
येथील जळगांव शहर विधानसभा निवडणूकी निमित्त अपक्ष उमेदवार कुलभूषण भाऊ वीरभान पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात बुधवारी रामेश्वर कॉलनी येथून करण्यात आली.
यावेळी राम नगर, स्वामी समर्थ चौक, मंगल पुरी, महाजन नगर, संपूर्ण रामेश्वर कॉलनी परिसर, आदित्य चौक इ. परिसरात प्रचार रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम