जळगावचे क्रिकेट प्रशिक्षक पंकज महाजन यांची BCCI लेव्हल-2 साठी निवड

बातमी शेअर करा...

जळगावचे क्रिकेट प्रशिक्षक पंकज महाजन यांची BCCI लेव्हल-2 साठी निवड

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्य्क नवलसिंगराजे पाटील यांच्याहस्ते सत्कार

जळगाव प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे येथील क्रिकेट प्रशिक्षक श्री. पंकज महाजन यांची BCCI लेव्हल-2 परीक्षेसाठी निवड झाली आहे. ही परीक्षा ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान बेंगळुरू येथील BCCI अंतर्गत राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या Centre of Excellence मध्ये पार पडली.या यशानिमित्त त्यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा पद्मालय गेस्ट हाऊस येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्य्क नवलसिंगराजे पाटील यांनी महाजन यांचा विशेष गौरव केला. कार्यक्रमाला विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, चेंबरचे पदाधिकारी व प्रशिक्षक उपस्थित होते.

पंकज महाजन यांनी याआधी २०२२ मध्ये BCCI लेव्हल-1 परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याआधी त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) ची लेव्हल-0 परीक्षा उत्तीर्ण करून लेव्हल-1 साठी पात्रता मिळवली होती.

महाजन हे खानदेशातील एकमेव क्रिकेट प्रशिक्षक असून, ज्यांनी BCCI लेव्हल-1 परीक्षा उत्तीर्ण करून लेव्हल-2 साठी पात्रता मिळवली आहे. ते २००४ पासून एकलव्य क्रीडा संकुलात क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर २०१९ पासून द्वारकाई टॅलेंट सर्च क्रिकेट अकॅडमीचे संचालक म्हणून कार्य पाहत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक क्रिकेटपटूंनी यशाची शिखरे गाठली आहेत.

पंकज महाजन यांना क्रिकेट प्रशिक्षण क्षेत्रात BCCI लेव्हल-1 साठी मार्गदर्शन अतुल गायकवाड (BCCI लेव्हल-4), मंदार दळवी, रंजीत देसाई, दिनेश नानावटी, भारताचे माजी यष्टिरक्षक साबा करीम, युवराज पाटील (नंदुरबार सचिव), संदीप दहाड (त्रिपुरा मुख्य प्रशिक्षक), तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्याकडून लाभले.

 

महाजन यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्यातील क्रिकेट प्रशिक्षक व खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम