जळगावच्या डॉक्टरची ३१ लाखांत फसवणूक
सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
जळगावच्या डॉक्टरची ३१ लाखांत फसवणूक
सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
जळगाव I प्रतिनिधी
मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याचा धाक दाखवत जळगावमधील एका डॉक्टरला तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ इतक्या रकमेचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी जळगावच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधिका नावाच्या महिलेने आणि राजेश प्रधान व मुकेश बॅनर्जी या दोन व्यक्तींनी संपर्क जळगाव शहरातील ५८ वर्षीय डॉक्टर यांना ३१ डिसेंबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत संपर्क करून . त्यांनी डॉक्टरांना त्यांनी एका मोबाईल क्रमांकावरून महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप केला . तसेच याप्रकरणात बांद्रा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची बतावणी केली. व्हाट्सपच्या माध्यमातून या गुन्हयाची नोटीस पाठवून
मोबाईल क्रमांकाचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात वापर झाल्याचे डॉक्टरला सांगण्यात आले. या गुन्ह्यात नरेश गोयल याला अटक झाली असून डॉक्टरांनाही अटक होऊ शकते, असे सांगून तिघांनी डॉक्टरांकडून वेळोवेळी ३१ लाख ५६ हजार ६४ रूपे इतकी मोठी रक्कम इतर खात्यांमध्ये हस्तांतरीत करून घेतली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून राधिका, राजेश प्रधान, आणि मुकेश बॅनर्जी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम