
जळगावच्या तीन उपविभागांना नवीन अधिकारी; संदीप गावित यांची भुसावळ येथे बदली
जळगावच्या तीन उपविभागांना नवीन अधिकारी; संदीप गावित यांची भुसावळ येथे बदली
जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवारी, ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पोलीस उपअधीक्षक (DySP) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले. या आदेशानुसार, जळगाव जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या उपविभागांना नवीन अधिकारी मिळाले आहेत.
प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये राज्य पोलीस सेवेतील एकूण ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जळगाव शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांची बदली भुसावळ उपविभागात करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्याला बाहेरून दोन नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी लाभले आहेत. विजयकुमार ठाकूरवाड यांची नियुक्ती चाळीसगाव उपविभागात करण्यात आली असून, बापू रोहोम हे मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
या बदल्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीची चाहूल लागली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गृह विभागाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात गती आणि कार्यक्षमतेत वाढ होईल, असे मानले जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम