जळगावमध्ये गुन्हेगारी टोळीवर पोलिसांचा ‘धींड’ कारवाईचा बडगा

बातमी शेअर करा...

जळगावमध्ये गुन्हेगारी टोळीवर पोलिसांचा ‘धींड’ कारवाईचा बडगा

​जळगाव: शहरातील गेंदालाल मिल परिसरात दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगारी टोळीला शहर पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. पोलिसांनी या टोळीतील चौघांना दोन गावठी पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. त्यानंतर, ज्या भागात त्यांनी दहशत माजवली होती, त्याच भागात त्यांची पायी धींड काढून पोलिसांनी गुन्हेगारांना एक स्पष्ट संदेश दिला. ​पोलिसांची धाडसी कारवाई ​शनिवारी रात्री गस्त घालणाऱ्या गुन्हे शोध पथकाला गेंदालाल मिल परिसरात माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या घराजवळ काही संशयित व्यक्ती फिरताना आढळल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे, पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. यावेळी एका आरोपीच्या कमरेला लोड केलेला गावठी कट्टा सापडला. त्यानंतर, पोलिसांनी त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता, त्यात आणखी एक कट्टा आणि दहा जिवंत काडतुसे मिळाली. ​या प्रकरणी पोलिसांनी युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३), सोहेल शेख उर्फ दया सीआयडी (वय २९), निजामोद्दीन शेख (वय ३१), आणि शोएब शेख (वय २९) या चौघांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​धींड काढल्याने नागरिकांमध्ये समाधान ​पोलिसांनी या आरोपींची त्याच भागात धींड काढली जिथे ते आपली दहशत निर्माण करत होते. यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे परिसरात भाईगिरी आणि दहशत निर्माण करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या या नव्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.शहरातील गेंदालाल मिल परिसरात दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगारी टोळीला शहर पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. पोलिसांनी या टोळीतील चौघांना दोन गावठी पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. त्यानंतर, ज्या भागात त्यांनी दहशत माजवली होती, त्याच भागात त्यांची पायी धींड काढून पोलिसांनी गुन्हेगारांना एक स्पष्ट संदेश दिला.
​पोलिसांची धाडसी कारवाई
​शनिवारी रात्री गस्त घालणाऱ्या गुन्हे शोध पथकाला गेंदालाल मिल परिसरात माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या घराजवळ काही संशयित व्यक्ती फिरताना आढळल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे, पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. यावेळी एका आरोपीच्या कमरेला लोड केलेला गावठी कट्टा सापडला. त्यानंतर, पोलिसांनी त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता, त्यात आणखी एक कट्टा आणि दहा जिवंत काडतुसे मिळाली.
​या प्रकरणी पोलिसांनी युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३), सोहेल शेख उर्फ दया सीआयडी (वय २९), निजामोद्दीन शेख (वय ३१), आणि शोएब शेख (वय २९) या चौघांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​धींड काढल्याने नागरिकांमध्ये समाधान
​पोलिसांनी या आरोपींची त्याच भागात धींड काढली जिथे ते आपली दहशत निर्माण करत होते. यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे परिसरात भाईगिरी आणि दहशत निर्माण करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या या नव्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम