
जळगावमध्ये दोन प्रौढांच्या आत्महत्या: शहरात खळबळ
जळगावमध्ये दोन प्रौढांच्या आत्महत्या: शहरात खळबळ
जळगाव: शहरातील नाथवाडा आणि रामेश्वर कॉलनी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन प्रौढांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटना रविवारी घडल्या असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विजय अहिरे यांची आत्महत्या
नाथवाडा परिसरातील विजय उर्फ पिंटू हिरामण अहिरे (वय ४६) यांनी रविवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई सुमनबाई यांनी त्यांना खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. या धक्क्याने त्या बेशुद्ध पडल्या. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी विजय यांना मृत घोषित केले. काही वेळापूर्वीच विजय यांनी आपल्या मोठ्या भावासोबत गप्पा मारल्या होत्या.
शंकर पाटील यांची आत्महत्या
रामेश्वर कॉलनीतील शंकर आधार पाटील (वय ४३) यांनीही रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारणही समजू शकलेले नाही.
या दोन दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम