
जळगावमध्ये धारदार सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक
जळगावमध्ये धारदार सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी नगर हुडको परिसरात धारदार सुरा घेऊन फिरणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी शनिवारी (३ मे) सकाळी अटक केली. या प्रकरणी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कल्पेश उर्फ बाळ्या देविदास शिंपी (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, हुडको) हा धारदार सुरा घेऊन परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिसांनी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून धारदार सुरा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम