जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट !
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट !
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
जळगाव प्रतिनिधी I
शहरात आज दि. 15 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवली. यात विविध आस्थापनांची तपासणी करुन दुध या अन्न पदार्थांच्या विविध ब्रॅण्डचे एकूण 14 नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. मे. रविराज एजन्सी, विसनजी नगर, जळगाव यांच्याकडे दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा सुमारे रु. 4095/- रुपयांचा साठा हा मुदतबाहय असल्याचा आढळून आल्यामुळे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून पुर्नवापर होवून नये म्हणून तत्काळ विक्रेता यांच्या समोरच हा साठा नष्ट करण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमावली अंतर्गत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर, सह आयुक्त ( नाशिक विभाग ) म.ना.चौधरी, जळगाव जिल्हयाचे सहायक आयुक्त ( अन्न ) सं.कृ.कांबळे व अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ.साळुंके व श.म.पवार यांनी केली . अशी माहिती जळगाव जिल्हयाचे सहायक आयुक्त ( अन्न ) सं.कृ.कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम